आमच्या गाईबद्दल माहिती
चला देशी गाई वाचवूया – आपल्या संस्कृतीचा आत्मा सुरक्षित करूया!
गाई आई फाउंडेशनच्या माध्यमातून देशी गाईंचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करा.
गाई म्हणजे आई – ही भावना पुन्हा समाजात जागवा.
🙏 आमच्याविषयी
गाई आई फाउंडेशन ही संस्था देशी गाईंच्या संरक्षणासाठी समर्पित आहे. भारतीय संस्कृतीत गाईला ‘माता’चा दर्जा दिला आहे. मात्र दुर्दैवाने, आज देशी गाईंच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
आम्ही केवळ गाई पाळणे एवढ्यावर न थांबता, त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी, त्यांच्या आयुष्यात गुणवत्ता, आणि त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाला रोजगार उपलब्ध करून देणे — हा आमचा मूलभूत उद्देश आहे.
आमच्या सेवेमार्फत आम्ही देशभरातील शेतकऱ्यांना देशी गाय संगोपनाचे प्रशिक्षण देतो, A2 दूधाचे महत्त्व समजावतो, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेतो.
गाईंचे लाड–प्याराने पालन, आधुनिक पशुवैद्यकीय सेवा, व आधुनिक गोशाळा व्यवस्थापन हे आम्ही प्रेमाने आणि श्रद्धेने करत आहोत – कारण गाई म्हणजे केवळ प्राणी नव्हे, ती आपली संस्कृतीची आत्मा आहे.

आमचे ध्येय
- भारतीय देशी गोवंशाचे संवर्धन व संरक्षण करणे.
- गाय दानाच्या माध्यमातून समाजामध्ये करूणाभाव वाढवणे.
- गायींच्या अन्न, निवारा व उपचारासाठी निधी उभारणे.
- गायींच्या पवित्रतेचे व औषधी महत्त्वाचे जनजागरण करणे.
- पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीसाठी गायींचे महत्त्व पटवून देणे.
- ग्रामीण शेतकऱ्यांना देशी गाय पालनाचे प्रशिक्षण देणे.
- गोशाळांमध्ये आधुनिक आणि नैसर्गिक सुविधा उपलब्ध करून देणे.
- स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवून गोरक्षण चळवळीला बळकटी देणे.
- जैविक शेतीसाठी गोमूत्र, गोबर आणि इतर गो-उत्पादनांचा वापर प्रोत्साहन देणे.
- पारंपरिक गोशाळा प्रणालीचे जतन व संवर्धन करणे.
संकट काय आहे?
भारतात पूर्वी २९ देशी गाईंच्या जाती होत्या, पण आता फक्त १४ शुद्ध जाती उरल्या आहेत!
देशी गाईंच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
क्रॉसब्रीड/जोडशंकर गाईंचा प्रसार वाढला आहे.
त्यांचं दूध गुणकारी नसतं, आणि त्या लवकर आजारी पडतात.

आमचे उपक्रम

आम्ही शुद्ध देशी गायींचे संगोपन करत आहोत ज्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना सुरक्षित आणि पोषक वातावरण देणे हे आमचे ध्येय आहे.

आमच्या गोशाळेतून आरोग्यदायी A2 दूध गरजू लोकांपर्यंत पोहोचवले जाते. शुद्धतेची हमी आणि आहारमूल्य जपले जाते.

शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागांमध्ये गोसंवर्धनाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाते. भारतीय संस्कृतीतील गायींचे स्थान समजावले जाते.